धक्कादायक; साडेपाच वर्षीय बालिकेचा ब्लेडने वार करुन खून

 


ईश्‍वरीला आई वडीलांनी काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चौधरी नगर भागातील तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या गणेश यांच्या बाथरूममध्ये रक्ताने माखलेली ईश्वरी दिसून आली. तिच्या दोन्ही हातावर आणि गळ्यावर ब्लेडच्या खोलवर जखमा झालेल्या होत्या.ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती . अशा अवस्थेत तिला मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग तालुका पोलीस ठाण्याचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेतली.

प्राथमिक अंदाजावरून हा खून लहान व्यक्तीने केल्याचा संशय बळावला आहे. ज्या व्यक्तीने हा खून केला आहे त्या लहान व्यक्तीचे घरामध्ये येऊन कपडेही बदललेले आहेत, तसेच बाथरूम मध्ये पाणी टाकून रक्ताने माखलेले बाथरुमही स्वच्छ केल्याचे दिसुन आले. घरात कपडे बदलल्यानंतर रक्ताने भरलेल्या पायाची ठसे घरात जागोजागी दिसत आहेत.ईश्वरी चे काका गणेश हे प्रयोगशाळा चालवतात त्यामुळे दिवसभर त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि त्यांची इतर दोन मुले हेच राहत होते. लहान व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

Post a Comment

0 Comments