स्वतः ला पेटवून तरूणीला मिठी मारलेल्या मुलाचा मृत्यु

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत संशोधक तरुणीला कवटाळले.

सदर घटना शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेतील बायोफिजिक्स विभागाच्या प्रयोगशाळेत सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. ९० टक्के भाजलेल्या तरुणाचा सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास मृत्यू झाला. तर तरुणी ४० टक्क्यांपेक्षा अधिक जळाल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

गजानन खुशालराव मुंडे (२९, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) व पूजा कडूबा साळवे (२८, ह.मु. एन ७, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) असे जळालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; गजानन हा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशाेधन करतो, तर पूजा ही शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात संशोधन करते. दोघांचे मार्गदर्शक एकच आहेत.


Post a Comment

0 Comments