रात्री प्रियकराला भेटायला आली होती विवाहित तरुणी गावकऱ्यांनी त्यांना पकडलं आणि मग.....

 


बिहारच्या सारणमध्ये विवाहित तरूणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावात आली. रात्रीच्या वेळी या जोडप्याला गावातील लोकांनी पकडलं आणि शेकडो लोकांसमोर दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं.

सध्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

21 वर्षीय सुजीत कुमारचं शेजारच्या गावातील रेखा कुमारी नावाच्या तरूणीसोबत अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. पण तरूणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न एका दुसऱ्या तरूणासोबत लावून दिलं होतं. पण तरीही रेखाच्या मनातून सुजीतचं प्रेम काही कमी झालं नाही.

दोघेही फोनवर नेहमीच बोलत होते आणि एकमेकांना आधार देत होते. यादरम्यान दोघांचं एकमेकांवरील प्रेम वाढत गेलं. रात्री सासरी कारण देत रेखा सुजीतला भेटण्यासाठी त्याच्या गावी आली. तेव्हा गावातील लोकांना दोघांना पकडलं. दोघांच्याही कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. नंतर जवळच्या मंदिरात त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.

या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. गावातील लोकांनी सांगितलं की, जेव्हा दोघांना पकडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांना लग्न करायचं आहे. तरूणी आधीच विवाहित आहे तरीही तिच्या मनात तिचा प्रियकर आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की, दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे. जेणेकरून दोघे आनंदाने जगू शकतील.

Post a Comment

0 Comments