अश्लील बोलून 13 वर्षीच्या मुलीचा विनयभंग

 


एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली.

प्रकार भोसरी येथे सोमवारी (दि.21) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी आदेश वाघमारे (वय-18 रा. भोसरी), वैभव (अंदाजे वय -17 पूर्ण नाव पत्ता माहित नाही), वैभव साखरे (वय-17 रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 354, 354 (अ), 509, 323, 504, 34, पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-35) भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात.
फिर्यादी यांची 13 वर्षाची मुलगी घरामध्ये असताना आरोपी वैभव घराजवळ येऊन मुलीला अश्लील भाषेत बोलला.
तसेच मागील तीन महिन्यांपासून आदेश आणि वैभव हे दोघे तिची छेड काढत अश्लील हातवारे करत होते.
हा प्रकार वारंवार घडत असल्याने फिर्यादी यांचे पती याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपी आदेश याने त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करुन
जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments