मुलींच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या वडिलांना मारहाण

 


आदेश वाघमारे (वय 18, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गल्लीतील मुले फिर्यादींच्या मुलीला वारंवार त्रास देत असत. एकाने फिर्यादींच्या मुलीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. इतर दोघांनी तिला जाता येता पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार फिर्यादींना समजला असता त्यांचे पती आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments