गाडी चालविण्यात सगळ्यात जास्त नाव बदनाम जर कुणाचं असेल तर ते आहे मुलींचं. सगळ्याच मुली सारख्या असतात असं यात म्हणणं नाही पण बहुतांश मुली गाडी चालवताना चुकतात. हेच व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात.
हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुनील पवार नावाच्या युझरने शेअर करत कॅप्शनमध्ये 'पापा की परी' असं लिहिलं आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या मधोमध एक पिवळा ट्रक तिरका उभा आहे, जो बार्ज खाली करतोय. या दरम्यान तिथून अनेक दुचाकी वाहने ट्रकच्या बाजूने जातायत.
हा ट्रकही रस्त्याच्या मधोमध उभा असला तरी दोन्ही बाजूने बाहेर पडणारे लोक व्यवस्थित बाहेर पडत आहेत. तितक्यात एक मुलगी स्कूटी घेऊन येते.
तिने आपली स्कुटी घेऊन सरळ यायचं तर ती यू टर्न घेते आणि ट्रकच्या पुढच्या भागाला जाऊन धडकते. सरळ गाडी येण्याऐवजी गाडी यू टर्न घेऊन हा सगळं पराक्रम होतो.
0 Comments