पुणे : किरकोळ वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून करणार्या तिघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे
विनोद वामन आल्हाट (वय ३७), अनिकेत बाळु नांगरे (वय २४), आकाश संतोष देवरुखे (वय २६. तिघेही रा. दांडेकर पुल, दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अक्षय रावडे (रा. धायरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना ८ ऑक्टोबरला जनता वसाहत परिसरामध्ये घडली होती.
किरकोळ वादातून रिक्षा चालकाचा खून केल्याची घटना दत्तवाडीत घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय खोमणे उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करीत होते. त्यावेळी रिक्षाचालकाचा खून करणारे तिघेजण दांडेकर पुलाखाली थांबल्याची माहिती पोलीस अमलदार अमित सुर्वे, अमोल दबडे, प्रमोद भोसले यांना मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले
0 Comments