उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये समाजकंटकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची मोडतोड करुन पुतळा फेकून दिला आणि त्या जागी दुर्गा मातेची मूर्ती बसवलीय.
समाजकंटकांनी उद्ध्वस्त केलेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा हा पुतळा अनेक वर्षांपासून इथं बसवण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दुर्गा मातेची मूर्ती तेथून हटवली आणि उद्यान सील केलं. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाहीय.
0 Comments