संतापजनक, दलीत महिलेवर पुजाऱ्यासह त्यांच्या साथीदाराकडून सामूहिक बलात्कार

 


अजमेर :राजस्थानच्या अजमेर  जिल्ह्यात एका 25 वर्षीय दलित महिलेवर  पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी संजय शर्मा हा पीडितेचा कौटुंबिक पुजारी असून त्यानं तिच्या घरांत अनेक धार्मिक विधीचे कार्यक्रम केले आहेत. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत अजमेरचे पोलीस उपअधीक्षक छवी शर्मा म्हणाले, "घरात एकटी दिसल्यानंतर आरोपीनं पीडितेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडिओही त्यानं बनवला."

पीडित महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं तिच्याकडून पैसे उकळले आणि नंतर काही जणांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपीनं पीडितेला सर्वप्रथम दारु पाजली, त्यामुळं ती या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची संख्या सांगू शकत नाहीय. पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलंय की, 'आरोपी पुजाऱ्यानं तिला ओलीस ठेवलं होतं आणि गेल्या एका महिन्यात अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला होता.'

Post a Comment

0 Comments