अस्वलाच्या क्रोधापुढे वाघाची झाली पळताभुई

 


जंगलामधील प्राण्यांच्या लढाईचे व्हिडीओ पाहिले असतील. मात्र त्यामध्ये नेहमीच सिंह किंवा वाघ यांचाच विजय झाल्याचे दिसून येते. पण काही असे देखील प्राणी आहेत ज्यांच्यापुढे यांनाही माघार घ्यावी लागते.

सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाघ आणि अस्वल यांची जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. या लढाईत कोण जिंकलं असं विचारल्यावर तुम्ही नक्कीच वाघ असच सांगाल. मात्र, या व्हिडीओमध्ये जे घडलं ते तुम्ही नक्कीच क्वचितच पाहिलं असेल.

व्हिडिओच्या सुरुवातीला एक अस्वल आणि वाघ समोरासमोर उभे असल्याचे दिसत आहे. खरंतर दोघेही लढाईसाठी आपापल्या पोझिशन मध्ये उभे आहेत. यानंतर अस्वल हळुहळू वाघाकडे येते आणि वाघ त्याच्या जागी तसाच उभा राहतो. पुढे काय होते हे पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहाच.

अस्वल हळूहळू पुढे येतो आणि वाघावर हल्ला करतो. अस्वल आपल्याजवळ हल्ला करायला येतो हे पाहून सुद्धा वाघ आपल्या जागेवर तसाच उभा राहतो. आणि त्यानंतर जे घडतं यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. अस्वलावर हल्ला करायचा सोडून वाघ घाबरतो आणि धूम ठोकतो. अस्वलाचा राग पाहून वाघ घाबरून पळत सुटतो. या व्हिडिओमध्ये अस्वलाला वाघावर विजय मिळवताना पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments