आई पाठीमागून धावत होती.... त्याने दरीत उडी घेऊन जीव दिला

 


बीडमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एक २० वर्षीय तरुण आत्महत्या करण्यासाठी घरातून धावत सुटला. त्याच्यामागे त्याची आईदेखील धावली... त्याला आत्महत्या करण्यापासून मात्र ती रोखू शकली नाही.

आईच्या डोळ्यादेखत त्याने २५० फूट खोल दरीमध्ये उडी घेऊन जीवन संपवलं... अन् आईने हंबरडा फोडला.

बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये आज ही घटना घडली आहे. मयत दिनेश लोमटे असं या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे. दिनेश हा पहाटेच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घरातून मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. त्याला रोखण्यासाठी आईही विनवणी करत मागे धावत होती. पण दिनेशवर काहीही परिणाम झाला नाही.

दिनेश धावतच होता, पुढे मॉर्निंग वॉकसाठी आलेले पत्रकार दत्ता आंबेकर, अशोक दळवे, बालाजी खैरमोडे, मारुती जोगदंड यांनी हा प्रकार पाहून दिनेशला थांबवून समजूत काढून शांत केले. यानंतर आई आली. दिनेशला आईच्या स्वाधीन करून पत्रकार पुढे गेले. परंतु त्याने पुन्हा पळत जाऊन, अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील व्ह्यू पॉइंटवरुन, जवळपास 250 फूट खोल दरीत आईच्या डोळ्यांदेखत उडी घेतली. हे पहाताच आईनं हंबरडा फोडला.


Post a Comment

0 Comments