प्रेयसीने त्याला अनेकदा समजावून सांगितले , अखेर नको तेच झालेच...

 


प्रियकराला वारंवार समजावूनही तो सोडायला तयार नसल्याने प्रेयसीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. शेरोन असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

शेरोनचा 25 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे.

शवविच्छेदन अहवालात विषामुळे शेरोनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत हत्येचे गूढ उकलले. याप्रकरणी पोलिसांनी शेरोनची प्रेयसी गरिश्माला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरोन आणि गरिश्माचे प्रेमसंबंध होते. पण, गरिश्माचा दुसऱ्या युवकासोबत विवाह ठरला होता. यामुळे तिला शेरोनसोबत प्रेमसंबंध ठेवायचे नव्हते. गरिश्माने त्याला वारंवार समजावून सांगितले. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. आपल्या कुंडलीत दोष आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या पतीचे निधन होईल, असे भटजींनी सांगितल्याचेही गरिश्माने शेरोनला सांगितले. एवढे सांगूनही शेरोन रिलेशीनशीप तोडायला तयार नव्हता. अखेर गरिश्माने त्याला आपल्या घरी बोलावले. घरी आल्यानंतर गरिश्माने त्याला ज्यूसमध्ये कीटनाशक मिसळून दिले. ज्यूस प्यासल्यानंतर शेरोन घरी परतताच त्याची प्रकृती खालावली. घरचे त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात घेऊन गेले.


Post a Comment

0 Comments