वृध्द उद्योगपतीला मुलानेच ठेवले डांबून

 


उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योगपती प्रल्हाद घुटे (वय ८०) यांना त्यांच्या मुलानेच बंगल्यात डांबून ठेवून रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

एवढेच नाही, तर कऱ्हाड येथील उपनिबंधक कार्यालयात नेऊन जबरदस्तीने कुलमुखत्यारपत्र व बक्षीसपत्रही केले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा, सून, नातू व नातसून यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन प्रल्हाद घुटे, वंदना नितीन घुटे, शुभम नितीन घुटे, टिना शुभम घुटे (सर्व, रा. उंब्रज ता. कऱ्हाड), उत्तम आनंदा केंजळे (रा. चरेगाव, ता. कऱ्हाड), कल्याण खामकर (रा. कारंडवाडी ता. कऱ्हाड), गणेश बबन पोटेकर, संदीप हणमटे पोतले (दोघेही, रा. मुंढे, ता. कऱ्हाड), दिगंबर रघुनाथ माळी (रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


Post a Comment

0 Comments