याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई वडील आणि बहिणीचे पती रिक्षातून जात होते. ते सुतारवाडी येथे आले असता त्यांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धक्का दिला. त्यात त्यांची रिक्षा पलटी झाली आणि रिक्षातील तिघेजण जखमी झाले. अपघात घडल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments