गडचिरोली : जिल्ह्यात वाघांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकदा वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. आरमोरी शहाराजवळ असलेल्या रामाळा येथे ही थरारक घटना घडली.
शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली शिंदी वृक्षाची पाने तोडण्यासाठी एक शेतकरी जंगलात गेला होता. त्यानंतर समोरून येणाऱ्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घातली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. आनंदराव दुधबळे असं मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. या धक्कादायक घटनेमुळं येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी देशपूरमध्येही वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठेमाजी आत्रामचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला.
0 Comments