भरदुपारी धूम स्टाईलने दोघांनी दागिने लुटले

 


दौंड तालुक्यातील पारगाव परिसरातील पासलकरवस्ती येथील एका महिलेला व लहान मुलाला घरासमोर मोटर सायकलवर येऊन चाकूचा धाक दाखवून दोन अनोळखी व्यक्तींनी ५७ हजार १२० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेली घटना घडली आहे.

तालुक्यातील पारगाव परिसरातील पासलकर वस्ती येथे सुनीता मनोहर पासलकर (वय ३२) ही महिला घरासमोर उभी असताना मोटर सायकल वरून दोन अनोळखी व्यक्ती आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे डोलरे व कानातील टाॅप्स व मुलाचे गळयातील सोन्याचे बदाम असा एकूण ५७,१२० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे घेवुन मोटार सायकलवर भरधाव वेगात निघुन गेले.

शनिवारी (दि.२९) दुपारी दोन वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. याबाबत सुनिता पासलकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोन अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असून यवत पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments