जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील सावतानगर भागातील शेख मुसा यांच्या मालकीच्या खोलीमध्ये मिलिंद नारायण पाडेवार (25) पत्नीसह भाड्याने दोन महिन्यापासून राहत आहे. मिलिंद पाडेवार हा त्याची पत्नी प्रतीक्षा (22) हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता.
रविवारी दुपारी प्रतिक्षा फोनवर बोलत होती, तेवढ्यात मिलींद पाडेवार याने कोणताही विचार न करता प्रतिक्षा हिच्यावर डोक्यावर कुर्हाडीने सात ते आठ वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिक्षाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मिलिंद पाडेवार रक्ताने माखलेल्या कुर्हाडीसह स्वतः परतूर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी परतुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. परतूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments