अनुदान घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बँकेतच हृदयविकराच्या झटक्याने मृत्यु


तिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आसताना शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर अनुदान मंजुर केले. दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे बँक खात्यावरील अनुदान घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा धावपळीत बँकेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला.

गोविंद प्रभाकर पोस्ते (वय-42) रा. कल्याणी माळेगाव असे त्या शेतकऱ्याचे नाव असून ऐन दिवाळीत पोस्ते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

जुलै महिन्यात पेरण्या करताच संततधार पाऊस सुरू झाला तसेच त्या पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आहे ते पीक सुद्धा संकटात सापडले होते. खरीप पिकं संकटात असल्यामुळे पेरणी केलेला सुद्धा खर्च निघणे अवघड झाले होते. नंतर सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर अनुदान वर्ग केलेले असल्यामुळे कल्याणी माळेगाव येथील शेतकरी गोविंद प्रभाकर पोस्ते हे दिवाळीचा किराणा तरी खरेदी करता येईल या उद्देशाने औराद येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेले. शेतकऱ्याच्या खात्यात फक्त प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे जमा असल्याचे सांगितले असल्यामुळे या गोविंद यांनी दोन हजार रुपयांची स्लिप भरली. बँकेत गर्दी झालेली असल्याने आत लवकर जाता आले नाही त्यामुळे ते बाहेर उभे होते. त्यावेळीच अचानक त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे ते खाली पडले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तरीही कल्याणी माळेगाव येथील काही नागरिकांनी त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या शेतकऱ्याच्या पश्चात कुटुंबामध्ये पत्नी , आई , दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments