मालवण : वायरी येथील रिक्षा व्यवसायिक निलेश मुरलीधर आंबेरकर (वय 46) याने राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
निलेश याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा अंदाज मालवण पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केला आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, नितीन नरले, युवराज झांजुर्णे, पोलीस कर्मचारी संतोष टेंबुलकर, कैलास ढोले यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. निलेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ व अन्य परिवार आहे.
0 Comments