6 लाख रुपयांची घरफोडी

 


सागर गजानन कामठे (वय 37 रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असाताना चोरट्यांनी पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यावर काळा स्प्रे मारला. तसेच, बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटची कडी तोडून घरात प्रवेश करत कपाटातील रोख 6 लाख रुपये चोरून नेले. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments