एका युवकासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या सिक्कीमच्या ब्युटीशिअनचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. युवतीच्या शरीरावर काच आणि चाकूने वार केल्याच्या खूणा आढळून आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ब्यूटीशिअन प्रेमा लांबा तमंग मुळची सिक्कीमची राहणारी होती. ती भोपाळमध्ये एका युवकासोबत एका महिन्यापासून लिव्ह इनमध्ये राहत होती. तपासादरम्यान मृत युवतीच्या प्रियकराने सांगितले की, शनिवारी रात्री दोघेही दारू प्यायले होते. या दरम्यान त्याला एका दुसऱ्या युवतीचा फोन आला होता. यावरून नशेत ती रागावली आणि मला मारहाण करू लागली होती. त्यानंतर तिने घरातील वस्तूंचीही तोडफोड केली. मी फोनवर बोलत बोलत दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि आतून कडी लावून घेतली. थोड्या वेळाने बाहेर येऊन पाहिले तर तिने काच आणि चाकूने स्वत:वर वार केले होते. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. होता.'
प्रेमा रोहित नगरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत होती. तिची ओळख हर्ष केशरवानी याच्यासोबत सोशल मीडियावरून झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेऊन दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. प्रेमाच्या परिवारातील लोक सिक्कीमहून भोपाळला येण्याची वाट बघितली जात आहे. त्यानंतर तिचे शवविच्छेदन केले जाईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.
0 Comments