साजनजी घर आये ... वरात आली दारात आणि नवरीबाईनी धरला भलताच ठेका ..बहिण भाऊ, मित्रमैत्रिणी, शेजारी यांच्या लग्नातसुद्धा (wedding season) आपण केवढे उत्साही असतो, तर मग स्वत:चं लग्न म्हटल्यावर उत्साहाला उधाण येणारच ना?
या नवरीचंही असंच काहीसं झालं आहे.. आपला होणारा नवरा वरात (groom and barat) घेऊन दारात आलाय म्हटल्यावर तर तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. तिचे आई- वडील, इतर नातेवाईक असे सगळे राहिले मागे आणि या नवरीबाईच (beautiful bride) पुढे झाल्या आणि वरातीच्या, नवरदेवाच्या स्वागताला सामोऱ्या गेल्या. तिने त्यांचं केलेलं आगळं- वेगळं स्वागत सोशल मिडियावर चांगलच गाजत आहे. आज- काल लग्न हा एक मोठा इव्हेंट झाला आहे. नवरा- नवरी आणि त्यांच्या घरची मंडळी हे सगळेच जण लग्नाच्या प्रत्येक लहान- मोठ्या कार्यक्रमाला एक मोठं स्वरुप देतात आणि तो प्रत्येक विधी किंवा तो प्रत्येक कार्यक्रम अधिकाधिक देखणा, सगळ्यांना लक्षात राहील असा, कसा होऊ शकतो, या प्रयत्नात असतात. म्हणूनच तर आता वरातीचं स्वागत, नवरदेव- नवरीची एन्ट्री, वरमाला घालण्याचा विधी, सप्तपदी या सगळ्याच कार्यक्रमात काही ना काही नाविन्य, वेगळेपण कसं येऊ शकतं, याचा विचार केला जातो. या लग्नाची गोष्ट आणि नवरीचा उत्साहदेखील काहीसा तसाच.

_weddings_pictures या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं दिसतंय की नवरदेव घोड्यावर बसून वरातीसोबत अगदी लग्न मंडपाच्या दारात आला आहे.

पुराच्या पाण्यात तरुणी टू व्हिलरवर सुसाट, हा मूर्खपणा महागात पडला तर.. पाहा व्हिडिओत्याचं आणि वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करण्यासाठी नवरीचं सगळं कुटूंब, नातलग बाहेर जमलेले आहेत. या सगळ्या स्वागताच्या आधी नवरी पुढे झाली आणि बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर जोरदार नाचू लागली. "साजनजी घर आये... साजनजी घर आये.." हे गाणं आणि त्या गाण्यावर नाचणारे सलमान खान, काजोल हे अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत. कोणत्याही लग्न समारंभासाठी अगदी परफेक्ट सुट होणारं हे गाणं. या नवरीनेही नेमका याच गाण्यावर ताल धरला आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतली. तिचा उत्साह नेटकरींनाही विलक्षण आवडून गेला.


Post a Comment

0 Comments