ज्युनिअर आर . आर . पाटलांचा धमाका , एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ' बाप ' दाखवला !

 


सांगली | सांगलीत आर. आर. आबांच्या(R.R.Patil) जाण्याने राजकारणात मोठी निराशा निर्माण झाली होती. अशातच आता आबांचे पुत्र रोहित पाटील(Rohit R.R. Patil) राजकारणात सक्रिय झाल्याने आबांच्या कार्यकर्त्यांना मोठा आधार आला आहे.


रोहित पाटील हे देखील आबांप्रमाणेच राजकारणात यशस्वी होत असल्याचं पहायला मिळत आहे. रोहित यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला(NCP) अजून एक दणदणीत विजय मिळवून दिला आहे.


सांगली जिल्ह्यातील किरदवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी पार पाडली. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या रोहित पाटील यांनी किरदवाडी ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहित यांच्या पॅनलच्या सात पैकी सात उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी कवठेमहांकाळ नगरपरिषदेतही रोहित पाटलांना दणदणीत विजय मिळाला होता.


किरदवाडीत रोहित पाटलांना विरोधक हे भाजप पक्षाचे खासदार संजयकाका पाटील(Sanjaykaka Patil) हे होते. संजयकाका यांचा उमेदवार सातपैकी एकाही जागी निवडूण न आल्याने संजयकाका आणि भाजपसाठी हा मोठा हा धक्का बसला आहे. या निवडणूकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु यात रोहित पाटील यांनी बाजी मारली.


दरम्यान, कवठेमहांकाळ नगरपंचायतीतून रोहित पाटलांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला होता. या निवडणूकीत विजय झाल्यानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी आबांची आठवण मनात दाटून येत आहे, आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल असं त्यांनी म्हटल होतं. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले होते.

Post a Comment

0 Comments