उत्तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात मजबूत संघटन करणार : हारुनभाई शेख

 


उत्तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात मजबूत संघटन करणार : हारुनभाई शेख


कमलेश शेवाळे /अहमदनगर प्रतिनिधी


अहमदनगर : आज समाजामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक समाजाला अनेक समस्या आणि भरपूर अडचणी आहेत परंतु त्या सोडविण्यासाठी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना नेहमीच प्रयत्नशील असतेच. आणि यासाठीच संघटने च्या वतीने प्रत्येक विभागात जनसंपर्क कार्यालय उघडण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात म्हणून उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा संचालक हारुनभाई शेख यांनी केली आहे. संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे देवा यांच्या मार्गदर्शनाखाली हारुनभाई शेख यांनी काल देवळाली गांव नाशिक येथे नाशिक जिल्हा आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी संचालक तथा खान्देश विभाग सचिव सौ अनिता आंबेकर यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख भरत नजन महाराष्ट्र राज्य संघटक योगेश पाटील प्रदेश संघटक संतोष जावळे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस समीरभाई शेख यांचा प्रथम नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर राजकुमार जैन यांची पोलीस मित्र संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी तर माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी रघुनाथ जोगदंड यांची निवड करण्यात आली. जिल्हा सल्लागार हरीशकुमार लोहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यावेळी हारुनभाई शेख यांनी नाशिक जिल्हा व काही ठराविक तालुका कार्यकारिणी जाहीर करुन नियुक्तीपत्र दिले त्यामध्ये सागर मोरे,स्वप्नील जोशी, ज्ञानेश्वर जेजरकर,सुरज गिते, बाळा काकडे,सचिन सोनवणे, निलेश लांडगे, इरफान अन्सारी,अमजद पठाण,राकेश सुर्यवंशी, शकंर पोटे,चंद्रशेखर पोटे,अंतोष धात्रक,किरण पवार, रफिक तांबोळी,मुद्दसर सय्यद, मुबारक सय्यद आदी पदाधिकारी यांची जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी वर निवड करण्यात आली आहे. ह्या बैठकीसाठी नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांनी खुप मेहनत घेतली आहे.

Post a Comment

0 Comments