पंढरपूर सिंहगडच्या तीन विद्यार्थ्यांची "सँकी सोल्युशन्स" कंपनीत निवड

 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची "सँकी सोल्युशन्स" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिगळे यांनी दिली.

     "सँकी सोल्युशन्स" हि कंपनी जगातील पहिले तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. हि कंपनी डिझाईन, अनुप्रयोग विकास, डेटा सेवा, ऑटोमेशन, टेक असेसमेटं आदी क्षेत्रात कार्यरत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील साक्षी राहुल उपलप, पिंपळनेर (ता. बार्शी) तेजश्री संजय बोडके, गादेगाव (ता.पंढरपूर) येथील असावरी बाळू कांबळे या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक तीन लाख रूपये पगार मिळणार आहे. पंढरपूर सिंहगड हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी माफक फी मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सेवा-सुविधा विद्यार्थ्यांना देत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने "आंतरराष्ट्रीय सिंहगड सोलार व्हेईकल चॅम्पियन शिप" आयोजित करणारे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे.

   कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. सुमित इंगोले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments