राज्य सरकार मध्ये , पहिल्या टप्यात 20,000/- जागांसाठी महाभरती जाहीर ! तसेच नविन पदनिर्मितीस मान्यता देणेबाबत शासन निर्णय निर्गमित


 Marathi Batmi 24 Taas : राज्य सरकार मध्ये पहिल्या टप्यात 20,000/- जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे .सध्या राज्य शासनाच्या विविध विभागामधील रिक्त पदांचा विचार करता पहिल्या टप्यामधील पदभरती करण्यावर राज्य सरकारकडुन सकारात्मक भुमिका घेण्यात येत आहे .यासंदर्भात राज्य शासनाकडुन महत्वाचे निर्णय दि.15.07.2022 रोजी घेण्यात आलेले आहेत .

राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये अनेक रिक्त पदे असे आहेत जे काळानुसार आवश्यक नाहीत .अशा पदांवर पदभरती न करण्याचे निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आले आहेत . ज्या पदांची आवश्यकता आहे , त्याचबरोबर यापुर्वी मंजुर नसणाऱ्या परंतु काळानुसार आवश्यकता असणाऱ्या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे .यामुळे आवश्यकतेनुसार वाढीव पदांची निर्मिती करुन आवश्यकता नसणारे पदे नामंजुर करण्यावर राज्य शासनाचे धोरण दिसुन येत आहेत . त्याचबरोबर जास्त जबाबदारीचे नसणाऱ्या पदांवर कंत्राटी / मानधन तत्वावर भरती प्रक्रिया करण्यावर राज्य शासनाचा जोर दिसुन येत आहे .

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील कृषी विभागतील पदे प्राधान्याने भरणेबाबत राज्य शासनाकडुन दि.15.07.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .तसेच आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प कक्षासाठी बाह्य यंत्रणेद्वारे / प्रतिनियुक्तीने पद भरण्यास मंजुरी देणेबाबत दि.14.07.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे .

सोर्स: मराठी संहिता

Post a Comment

0 Comments