फलटणमध्ये घरफोडीत 15 तोळ्यांचे दागिने चोरीस

 


फलटण - शहरातील लक्ष्मीनगर येथे बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 1 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रवीण प्रतापराव देशमुख (फ्लॅट नं. 1, रामटेक अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, फलटण) हे कुटुंबासह दि. 1 एप्रिल रोजी काही कामानिमित्त परगावी गेले होते. ते बुधवारी सकाळी 11 वाजत घरी परत आले असता, मुख्य दरवाजाचे कुलूप व सेफ्टी दरवाजा तोडलेला दिसला.

देशमुख यांनी घरात जाऊन पाहिले असता आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर देशमुख यांनी लोखंडी व लाकडी कपाटे पाहिली असता, तीदेखील तोडल्याचे दिसले. कपाटांमधील सामानही अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने शोधले असता, 15 तोळ्यांचे दागिने व 1 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.


Post a Comment

0 Comments