खळबळजनक! अल्पवयीन प्रेयसीचे दुसऱ्यासोबत अफेअर, अल्पवयीन प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

 


पिंपरी -चिंचवडमध्ये प्रेयसीच्या अफेअरवरून तिच्या पहिल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

हत्या करणाऱ्या प्रियकरावरुद्ध सहा महिन्यांपूर्वी प्रेयसीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दिली होती.या प्रकरणात अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात ही घेतलं होतं. तीन महिने त्याला बालसुधारगृहात राहावं लागलं होतं. त्यानंतरही त्यांच्यात भेटीगाठी सुरूच होत्या. एक एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता होती. दोन एप्रिलला तशी तक्रार पालकांनी चिखली पोलिसात दिली. चिखली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह चिखलीतील नव्याने बांधण्यात येत असलेल्या महानगरपालिकेच्या सांस्कृतिक भवन इमारतीच्या टेरेसवर आढळला. यामुळे शहरात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगी प्रियकराला भेटायला गेली होती. तिथे तिने मी दुसऱ्यावर प्रेम करते, असे म्हणत प्रियकराला चिडवले. त्या व्यक्तीचा फोटोदेखील प्रियकराला दाखवला. याच कारणावरून चिडून रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीवर कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना रात्री उशिरा उजेडात आली. घराबाहेर गेलेली मुलगी परत न आल्याने चिंतेत असलेल्या पालकांनी दोन एप्रिल रोजी चिखली पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. प्रकरण गंभीर असल्याने चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, मोबाईल लोकेशनबाबत माहिती मिळवताना नव्याने बांधण्यात येत असलेल्या महानगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनाच्या परिसरात मुलीचे लोकेशन असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सर्व इमारत आणि परिसर पिंजून काढत असताना इमारतीच्या टेरेसवर अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.

काही तासांतच हत्या झालेल्या मुलीच्या अल्पवयीन प्रियकराला आणि प्रियकराच्या मित्राला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. प्रेयसीचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याच्या संशयावरून तिची हत्या केली असल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले असून, अल्पवयीन प्रियकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.


Post a Comment

0 Comments