पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात कुकर घालून त्याने पत्नीला ठार मारले आहे. चंदननगरमधील थिटे वस्तीत हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आहे. दरम्यान अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा नोंद केला आहे. रंदावनी राजेभाऊ पारखे (वय 36) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी पती राजेभाऊ किसन पारखे (वय 42) याला अटक केली. याबाबत रंदावनी यांची आई राधाबाई नाटकर (वय 53) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार 12 मार्च रोजी घडला आहे.
रंदावनी व राजेभाऊ यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघे थिटे वस्ती येथे राहत होते. दरम्यान राजेभाऊ हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून या दोघांत वाद होत असत. घटनेच्या दिवशी देखील दोघात वाद झाले. या वादातून राजेभाऊ याने डोक्यात कुकरणे मारहाण करत तिचा खून केला. खूनप्रकरणात महिलेचा अंत्यविधी झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करत पतीला अटक केली. चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments