एसटी बस - बाईकमध्ये भीषण अपघात , पुण्यातील तीन तरूणांचा जागीच मृत्यु

 


साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला आहे.

एसटी बस आणि बाईक यांच्यातील धडक इतकी जोरदार होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

अनिल नामदेव थोपटे -गायकवाड वय २५ वर्ष, पोपट अर्जन थोपटे -गायकवाड वय २३ वर्ष, ओंकार संजय थोपटे-गायकवाड वय २२ वर्ष अशी अपघातातील मृत्यांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद-निरा रोडवर म्हणजेच लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी व मोटरसायकलची जोरदार धडक झाली. या धडकेत मोटरसायकलवरील तीन युवक जागीच ठार झाले. गुरुवारी रात्री मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि निरेकडून लोणंद निघालेले तीन तरुणांची बाईक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघाताची तीव्रता एवढी होती की यामध्ये मोटरसायकलवरील तिन्ही तरुण जागीच ठार झाले. 

अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.


Post a Comment

0 Comments