भोसरी: पादचारी तरूणाचा मोबाईल हिसकवला

 



श्रीमोहम्मद साहिद मोहम्मद रहिमुद्दिन मन्सुरी (वय 24, रा. भोसरी. मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी फिर्यादी रस्त्याने पायी चालत कामावर जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी  फिर्यादी यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments