प्रॉपर्टीचा वाद टोकाला गेला , पुतण्याने भररस्त्यातच काकांवर

 


उल्हासनगर  : प्रॉपर्टीच्या वादातून पुतण्याने  भररस्त्यात  दोन  सख्या काकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

हल्ल्यात एका काकाचा मृत्यू झाला असून, दुसरे काका गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण बदलापूर रोडवर सकाळी 7 वाजता ही घटना घडली. घटनेत मनवीर मरोठिया यांचा मृत्यू झाला, तर रामपाल करोतीया हे जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

प्रॉपर्टीच्या वादातून घडली घटना

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन चौकात आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा आपल्या सख्या काकांशी प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, भररस्त्यात पुतण्याने आपल्या दोन्ही काकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एका काकांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा काका जखमी झाला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पुतण्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments