बैलगाडा शर्यतीवेळी बैलजोडीचा कृष्णा नदीत पडून मृत्यु

 


सातारा: सध्या सर्वत्र बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहेत. मात्र, शर्यतीदरम्यान अनेक अपघाताच्या घटनाही घडत आहेत. अशीच घटना कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावात घडली.

ठिकाणी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी बैलगाडी कृष्ण नदीपात्रात पडल्याने दोन बैलांचा नदीच्या पाण्यात बुडवून गुदमरून मृत्यू झाला. तर चालकाने बैलगाडीतून उडी मारल्याने तो बचावला. या घटनेनंतर शर्यती रद्द करण्यात आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीक्षेत्र कोल्हेश्वर देवस्थान आणि उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाड्यांची नोंदणी झाल्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास शर्यती सुरू करण्यात आल्या.

यावेळी कृष्णा नदीपात्रापासून सुमारे 600 ते 700 फूट अंतरावर उत्तर - दक्षिण (कोल्हेश्वर मंदिर) असे शर्यतीचे सात ट्रॅक उभारले होते. दुपारी दोनच्या सुमारास शर्यतीचे सात फेरे पूर्ण झाल्यावर आठव्या फेरीसाठी सात बैलगाड्या उत्तर दिशेकडे गेलेल्या होत्या. त्यानंतर झेंडा पडताच बैलगाड्या सुसाट धावू लागल्या.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पशूंची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आता कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. Hello Krushi या अँपवर तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरातील पशूंची खरेदी करू शकता आणि तुमच्या जनावरांची सुद्धा घरी बसून विक्री करू शकता. त्यामुळे कोणत्याही एजंटच्या मार्फत होणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे हॅलो कृषी तुम्हाला हि सेवा अगदी मोफत देत आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे अँप डाउनलोड करून Install करा.

अँप ओपन करताच तुम्हाला प्राणी खरेदी- विक्रीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करताच तुम्हाला हवी असलेली जनावरे, त्यांच्या मालकाचा मोबाईल क्रमांक आणि ठिकाण याबाबत सविस्तर माहिती मिळेल. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, तुमच्या आसपासची खत दुकाने, कृषी सेवा केंद्र यांची संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे आजच हॅलो कृषी मोबाइल मध्ये डाउनलोड करा.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

यावेळी सीमारेषेपासून सुमारे 800 फूट अंतरावर गाड्या आलेल्या असताना शेवटच्या एका ट्रॅकमधील एक बैलगाडी आपला ट्रॅक सोडत उधळली व ती पूर्वेला असलेल्या कृष्णा नदीपात्राकडे धावली. यावेळी चालकाने बैलगाडी थांबवून दक्षिण व उत्तरे दिशेस वळवण्याचा प्रयत्न केला मात्र, बैलगाडी नदीपात्राच्या दिशेने जाऊ लागल्याने चालकाने बैलगाडीतून उडी घेतली आणि बैलगाडी दोन्ही बैलांसह नदीत सुमारे 75 फूट खोल कोसळली. त्यात दोन्ही बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे बुडाले. तोवर मदत मिळेपर्यंत दोन्ही बैल मृत्युमुखी पडले. मृत्यमुखी पडलेल्या दोन्ही बैलांपैकी एक बैल त्रिपुटी (ता. कोरेगाव) आणि दुसरा बैल मालगाव (ता. सातारा) येथील होते. या घटनेमुळे कोरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments