वाकड: काळाखडक येथून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

 दिनेश सहादु सहानी व प्रदीप संदीप सरोज (दोघे रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक वाकड येथे दारूची वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एमएच 12 क्यू डब्ल्यू 2272 हा टेम्पो अडवला. टेम्पोमधून गावठी हातभट्टी दारूने भरलेले 14 मोठे हत्ती कॅन्ड आणि टेम्पो असा दोन लाख 14 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे एक) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे दोन) रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, पोलीस शिपाई सौदागर लामतुरे यांनी केली.
Post a Comment

0 Comments