पिंपरी: दुचाकीचा धक्का लागल्याने मारहाण

 


पिंपरी;  दुचाकीचा रिक्षाला धक्का लागल्याने टोळक्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. ही घटना देहूगावातील भैरवनाथ चौकात शुक्रवारी (दि.24) साडेसहाच्या सुमारास घडली.

कृष्णा राजाराम शिंदे (22, गॅरेज मॅकेनिक, रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार श्रीराम देशमुख (32), राम भोसले, रोहित वाघ, विष्णू वाघ, विजय सुर्वे व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी शिंदे हे दुचाकीवरून भंडारा डोंगराकडे जात असताना भैरवनाथ चौकात त्यांच्या दुचाकीचा श्रीराम देशमुख यांच्या रिक्षाला धक्का लागला. या कारणावरून टोळक्याने शिंदे यांना शिवीगाळ व मारहाण केली. तनंतर फिर्यादीने याठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न केला असतानादेखील त्याला पुन्हा थांबवून टोळक्याने मारहाण केली. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments