सातारा: शर्यत पाहताना बैलगाड्याची धडक बसुन वृध्द ठार

 


म्हसवड (सातारा) : माण तालुक्यातील शिरताव येथील यात्रेत आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमधील बैलगाडीची धडक बसून दाजी गणपती काळेल (वय ६२, रा. वळई, ता. माण) या वृद्धाचा मृत्यू झाला

ही घटना शनिवारी घडली.

शिरताव येथील ग्रामदैवताची यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी दाजी काळेल हे वळई येथून संतोष या मुलासमवेत मोटारसायकलवरून शनिवारी दुपारी शिरताव येथील यात्रेस आले होते. बैलगाडा शर्यत पाहत असताना दाजी काळेल यांना शर्यतीमधील भरकटलेल्या गाड्याच्या बैलाची धडक बसल्याने ते गंभीर जखमी होऊन मृत झाल्याची घटना घडली.

शिरताव बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी दाजी काळेल हे चाकोरीचा शेवट असतो तेथे उभे राहिले होते. याचदरम्यान बैलगाडा भरकटून त्यांच्या अंगावर गेला. यामध्ये काळेल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना लक्षात येताच संयोजक, तसेच शर्यत पाहण्यासाठी आलेले त्यांच्याकडे धावून गेले. त्यांना पुढील उपचारासाठी म्हसवड येथे नेत असताना वाटतेच त्यांचा मृत्यू झाला. म्हसवड येथील डाॅक्टरांनी तपासणी केली असता अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments