कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेला तो परतलाच नाही, मनमाडमध्ये नेमक काय घडलं...

 


मालेगाव : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही. काही शेतांमध्ये पाणी देण्यासाठी विहिरी तयार करण्यात आल्या आहेत.

विहिरीमधील पाणी पिकांना द्यावं लागते. पण, कधीकधी या विहिरीसुद्धा धोकादायक ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी आजीसोबत शेतात पाणी आणण्यासाठी गेलेली १४ वर्षीय मुलगी विहिरीत पडली. बाजूला बांधलेल्या म्हशीने धक्का दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता मनमाड भागात दुसरी घटना समोर आली. या घटनेत शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. विहिरीतील पंप चालू करण्यासाठी गेलेल्या रवींद्र दराडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे शेतात जाण्याचा हा त्यांचा शेवटचा दिवस ठरला.

मनमाडच्या गर्डरशॉप भागात शेतातील कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. रवींद्र बाळू दराडे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मनमाड-भुसावळ लोहमार्ग रेल्वे लगतच्या पाचीपुल भागातील शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. विहिरीवरील वीज पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाला.

रवींद्र दराडे हा तरुण शेतकरी. शेतात कांद्याचे पीक घेत होते. कांद्याला पाण्याची गरज होती. त्यामुळे ते कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेले. शेतात विहीर आहे. या विहिरीत वीज पंप आहे. तो वीज पंप सुरू करण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. पण, तोल गेल्याने ते खाली पडले. त्यामुळे विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरीत पडल्यानंतर गटांगळ्या खाऊ लागले. पण, वेळेवर त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

शेतातून पिक घेण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करतात. रात्री-अपरात्री शेतात जातात. मात्र, त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. कांद्याचे सध्या वांदे झाले आहेत. अतिशय कमी दरात कांदा विकावा लागत आहे. त्यात पिक घेण्यासाठी धोका पत्करून शेतकऱ्याला काम करावं लागतं. त्यात त्यांचा जीवही जातो.

Post a Comment

0 Comments