पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाने गळफास घेत घेतला जगाचा निरोप.....

 


पुणेः शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी बुधवारी (ता. १५) सायंकाळच्या सुमारास शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या राहटाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे.

मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी एका नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत असल्याबाबतचे सांगितले आणि गळफास घेतला. नातेवाईक काही वेळातच सदर ठिकाणी गेले असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय ३४ वर्षे रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

जितेंद्र मांडगे यांनी नैराष्येतून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करत आहे.


Post a Comment

0 Comments