उद्याच्या पेपरचा अभ्यास न झाल्याने तरूणाने उचलले, हे पाऊल

 


नागपूर: आजकाल तरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कोण प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करत आहे तर कोणी एकतर्फी प्रेमातून, कोण आई - वडील रागावल्यामुळे तर कोण परीक्षेचा अभयास न झाल्यामुळे करत आहे.

अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

यश प्रकाश माने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो जुनी वस्ती, एसआरए बिल्डिंगजवळ झिंगाबाई टाकळी या ठिकाणी राहतो. परीक्षेचा अभ्यास न झाल्याने उद्याच्या पेपरमध्ये काय सोडवणार, या टेन्शनमुळे यशने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मानकापूर येथील गोधनी रेल्वेलाईन या ठिकाणी बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. 

यश व्हीएमव्ही महाविद्यालयात एमसीए (मास्टर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिकत होता. यशचा बुधवारी सकाळी एमसीएचा पेपर होता. मात्र, आदल्या रात्री म्हणजे मंगळवारी तो रात्री बारा वाजताच्या सुमारास तो घरातून कुणालाही न सांगता निघून गेला. यानंतर चा भाऊ अतुल माने आणि नातेवाईक यांनी त्याचा रात्रभर शोध घेतला पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सकाळी यश हरवला असल्याची मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांना सूचना मिळताच तातडीने शोध सुरु केला तेव्हा त्यांना यशाचा मृतदेह आढळून आला. यशच्या मृत्यूने माने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


Post a Comment

0 Comments