मारहाण करून पेट्रोल पंपावरील चोरटयांनी पैसे लुटले

 


नाशिक  जिल्ह्यात काल एक घटना घडली, त्यामध्ये चोरट्यांनी पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन त्याच्याकडे असलेली दीड लाख रुपयांची रोकड पळविली होती.

परंतु पोलिसांनी पाठलाग केला आणि चार तासात चौघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे चौघांची चौकशी केली असता, पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुध्दा त्यांच्यात समाविष्ठ असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोकड सुध्दा ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची पोलिस कसून चौकशी करीत असून त्यांच्याकडून अजून काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.

नाशिक मधील औरंगाबाद रोडवरील ओढा येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून दीड लाख रुपये लुटल्याची घटना घडली. चोरी करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अवघ्या चार तासात शहापूर येथून अटक केली आहे. या लुटीच्या घटनेत एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या तिन्ही संशयितांकडून 1 लाख 42 हजार रुपयांची रक्कम आणि 75 हजार रुपयांचे दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापुर्वी ट्रॅक्टरची चोरी झाल्याचं प्रकरण ताज असताना काल रात्री एका शेतकऱ्यांच्या तब्बल दीड लाखांच्या शेळ्या चोरुन नेल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे पोलिस सुध्दा चिंताग्रस्त असल्याचं वारंवार उजेडात आलं आहे. येत्या काळात चोरीला घटना रोकण्यासाठी पोलिसांना नवी शक्कल लढावी लागणार आहे एवढं मात्र नक्की.


Post a Comment

0 Comments