महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

 करंदी (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन युवतीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नारायण बिचुकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील महाविद्यालयीन युवती घरात अभ्यास करत असताना गावातील नारायण बिचुकले हा व्यक्ती दारुच्या नशेत युवतीच्या घराजवळ आला त्याने घरात जाऊन युवती अभ्यास करत असताना तिचा हात पकडत तिच्या मनाला उत्पन्न होईल असे कृत्य केले.

दरम्यान युवती आरडाओरडा करू लागली असताना बिचुकले याने युवतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी युवतीच्या आवाजाने शेजारील काही नागरिक धावून आले असता नारायण बिचुकले हा तेथून पळून गेला घडलेल्या प्रकाराबाबत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नारायण बिचुकले रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे या इसमावर विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ज्योती आहेरकर या करत आहे.


Post a Comment

0 Comments