क्रेडिट कार्ड चालू करण्याच्या बहाण्याने एकाची लाख रुपयाची फसवणुक

 


सोग्रस (जि. नाशिक) : क्रेडिट कार्ड बंद पडले असून ते पुन्हा चालू करून देण्याचे सांगत खात्यातून संशयित याने ९९ हजार ३२३ रुपये ट्रान्स्फर करत सुमारे एक लाख रुपयाची फसवणूक केली.

चांदवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड शहरातील फुलेनगर मधील रहिवासी बबन सोनवणे यांच्या मोबाईलवर संशयित याने संपर्क करत तुमचे क्रेडीट कार्ड बंद असून ते चालू करण्यासाठी सांगितले.

त्यासाठी मोबाईलवर पाठविलेल्या लिंकवर जाण्याचे सांगत त्यांच्या कार्डची संपूर्ण माहिती घेत भामट्याने त्यांच्या खात्यातून १४ हजार १८९ रुपये सात वेळा काढत सोनवणे यांची ९९ हजार ३२३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.


Post a Comment

0 Comments