वडिलांनी विवाहाआधी मुलीची चक्क जेसिबितून काढली मिरवणूक

 


मंचर (जि. पुणे) - कळंब (ता. आंबेगाव) येथील कन्या योगिता भालेराव हिची विवाहनिमित्त जेसीबीतून मिरवणूक काढून लग्न सोहळा कुटुबीयांनी साजरा केला. तालुक्‍यात पहिल्यांदाच जेसीबीमधून नववधूच्या काढलेल्या मिरवणुकीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

सार्थक जेसीबी आणि पोकलेन सर्व्हिसचे उद्योजक महेश नामदेव भालेराव यांची कन्या योगिता भालेराव हिचा विवाह होण्याअगोदर लग्नानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी कळंब ग्रामस्थ व नातेवाइकांची गर्दी पुणे-नाशिक महामार्गावर झाली होती.

यावेळी नववधूला शुभेच्छा देण्यासाठी मिरवणुकीदरम्यान उपसरपंच गोकुळ भालेराव, उद्योजक विष्णू कानडे, अमित भालेराव, मयूर भालेराव, द्राक्ष बागायतदार अनिल कानडे, नीलेश कानडे, भरत भालेराव, किरण पवार, विक्रम भालेराव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंचर येथे खेड तालुक्‍यातील पत्रकार कोंडीभाऊ पाचारणे आणि तिन्हेवाडीच्या माजी सरपंच कविता पाचारणे यांचा मुलगा निखील याचा शुभविवाह थाटामाटात पार पडला.


Post a Comment

0 Comments