विश्रांतवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

 


पुणे: बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने 17 जणांवर कारवाई करुन 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाई मंगळवारी (दि.21) विश्रांतवाडी परिसरात केली.

विश्रांतवाडी परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण बेकायदेशीर मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पथकाने पाळत ठेवून छापा टाकला.  त्यावेळी काही व्यक्ती मटका जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पथकाने 16 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 17 जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी  कायद्यांतर्गत गुन्हा  दाखल केला आहे. तर ताब्यात घेतलेल्या 16 जणांना पुढील कारवाईसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार 
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक 
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे 
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे 
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव 
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील 
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, इम्रान नदाफ,
इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.


Post a Comment

0 Comments