बस स्टॉपवर तरुणीचा विनयभंग करत मारहाण करणाऱ्याला अटक

 


याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दशरथ मंगलसिंग साबळे (वय 26 रा.नांदेडगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बस स्टॉपवर थांबल्या असताना आरोपी तेथे आला व त्याने अचानकपणे फिर्यादीचा हात पकडून ओढले व त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच सिवीगाळ करत मारहाण देखील केली. माझ्या सोबत आली नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकी दिली. यावरून निगडी पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments