प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय युवकाचा खून

 


वाई तालुक्यातील खानापूर येथे अभिषेक जाधव या 20 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. परखंदीच्या शिवारात आज सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला आहे.

संबधित युवकाची अोळख पटली असून प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज गुरूवारी सकाळी परखंदीच्या शिवारात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. याबाबातची माहिती पोलिसांना मिळल्या नंतर वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या खून प्रकरणामुळे खानापूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अभिषेक जाधव या युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सकाळी परखंदीत गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. अधिक तपास घटनास्थळी करण्यासाठी पोलिसांनी तळ ठोकला आहे.


Post a Comment

0 Comments