कौटुंबिक वादातून तरूणाचा खून

 कौटुंबिक कारणावरून आठ ते दहा जणांनी मिळून लोखंडी रोड व काठीने केलेल्या मारहाणीत २७ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. नितीन अनिल पतंगराव ( वय २७, रा. हुचेश्वर नगर, सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या हकीकत अशी की, शनिवारी रात्री कामावरून घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरुन ८ ते १० जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत त्यास डोक्यास जखम व खाद्यास मार लागल्याने सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. नितिन पतंगराव यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच शासकिय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

Post a Comment

0 Comments