धुळे हादरलं! दिवसाढवळ्या भर वस्तीत प्राणघातक हल्ला करत तरुणाची हत्या

 


धुळे: राज्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धुळे जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये घरातील एकुलता एक असलेल्या 22 वर्षीय तरुणाचा दिवसाढवळ्या भर वस्तीत खून करण्यात आला आहे.

काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

शिरपूर शहरातील शिंगावे गाव शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राहुल राजू भोई या 22 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. धारदार शस्त्राने पोटात वार करुन त्याचा खून करण्यात आला. यानंतर राहुलला जखमी अवस्थेमध्ये तातडीने क्रांतीनगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी राहुल राजू भोई याला तपासून मृत घोषित केले. 

या घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथक शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. यावेळी तरुणांची शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यावेळी ज्या व्यक्तीने राहुल याच्यावर वार करून त्याचा खून केला तोदेखील रक्तबंबाड झाला आहे. मात्र संशयित आरोपी अद्याप फरार असून शिरपूर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments