पहिली चोरीची घटना भोसरी येथील गुळवे वस्तीतील नमो स्टील ट्रेडिंग या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 2 लाख 15 हजार रुपयांचे स्टील, कॉपर व ब्रासचे रॉड, बुश व प्लेटचा मुद्देमाल तसेच सीसीटीव्हीचा डिव्हीआर चोरून नेला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात महेंद्र कालीदास कांकरीया (वय 39 रा.भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी भोसरी येथील लांडेवाडी परिसरातील दत्त मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व दानपेटी उचकटून त्यातील 30 हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात प्रल्हाद तुकाराम पासलकर (वय 55 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून भोसरी पोलीस चोरांचा तपास घेत आहेत.
0 Comments