किरकोळ वादातून महिलेला धक्काबुक्की करत विनयभंग

 


महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात रोहन संजय धुमाळ (वय 22 रा. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात हिंजवडी येथील डान्स स्टुडीओ येथे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच रागातून आरोपीने फिर्यादी यांच्या स्टुडीओची तोडफोड करत फिर्यादी यांना धक्काबुक्की करत गैरवर्तन केले व शिवीगाळ केली.  यावेळी फिर्यादीचे पती व पार्टनर मध्ये आले असता त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments